Posts

Showing posts from November, 2026

राम आदर्श आहे, रावण ही टाळायची वृत्ती आहे!

Image
राम आदर्श आहे, रावण ही टाळायची वृत्ती आहे! ©️🖌️ YD शब्दांतून राष्ट्रचिंतन मांडण्याचा एक प्रयत्न… बहिणीसोबत रामायणावर आधारित चित्रपट पाहायला गेलो. चित्रपट पाहण्याआधीच मत द्यायचं नाही, स्वतः पाहायचा आणि मग बोलायचं, असं ठरवलं होतं. चित्रपट पाहिला. पण रामाला चित्रपटात ज्या पद्धतीने दाखवलं आहे, ते मला स्वीकारार्ह नाही. म्हणूनच रामायणाच्या कथेची ही चित्रपटीय मांडणी मी स्वीकारू शकत नाही. माझा आक्षेप कुणाच्या अभिनयावर, दिसण्यावर किंवा पडद्यावरील भव्यतेवर नाही. राम आणि रावण या व्यक्तिरेखांकडे पाहण्याची जी दृष्टी चित्रपटातून समोर आली, त्यावर आहे. मला जाणवलेला राम एखाद्या नेहमीच्या चित्रपटातील नायकासारखा होता. नायिका संकटात सापडते, तिला वाचवण्यासाठी नायक प्रतिज्ञा करतो आणि संघर्षाला निघतो, इतक्यापुरतं रामाचं व्यक्तिमत्त्व मर्यादित झाल्यासारखं वाटलं. सीतेची सुटका हा रामकथेचा महत्त्वाचा भाग आहेच. पण राम म्हणजे केवळ नायिकेला वाचवायला निघालेला नायक नाही आणि सीता म्हणजे केवळ संकटात सापडलेली नायिकाही नाही. त्यांच्या नात्याला, त्यागाला आणि जीवनप्रवासाला इतक्या साध्या चित्रपटीय चौकटीत बसवलं, तर रामायण...

विचारविश्वात आपले स्वागत!

©️🖌️ YD शब्दांतून राष्ट्रचिंतन मांडण्याचा एक प्रयत्न… नमस्कार! माझे विविध विषयांवरील लेख एकाच ठिकाणी वाचता यावेत, त्यांचा संग्रह व्हावा आणि वाचकांशी संवाद साधता यावा, या उद्देशाने हे विचारविश्व सुरू करत आहे. वैचारिक लेख, संघविचार, समाजसेवा, प्रेरणा आणि अनुभव या विभागांत जुने व नवीन लेख टप्प्याटप्प्याने जोडले जातील. विषय निवडण्यासाठी वरचा मेनू वापरा. एखादा शब्द किंवा विषय शोधण्यासाठी शोधाची सोयही उपलब्ध आहे. हा लेखसंग्रहाचा प्रारंभ आहे. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना प्रत्येक लेखाखाली जरूर नोंदवा. विषयवार लेखसंग्रह पाहा · माझ्याविषयी