राम आदर्श आहे, रावण ही टाळायची वृत्ती आहे!

राम आदर्श आहे, रावण ही टाळायची वृत्ती आहे!
©️🖌️ YD
शब्दांतून राष्ट्रचिंतन मांडण्याचा एक प्रयत्न…
बहिणीसोबत रामायणावर आधारित चित्रपट पाहायला गेलो. चित्रपट पाहण्याआधीच मत द्यायचं नाही, स्वतः पाहायचा आणि मग बोलायचं, असं ठरवलं होतं. चित्रपट पाहिला. पण रामाला चित्रपटात ज्या पद्धतीने दाखवलं आहे, ते मला स्वीकारार्ह नाही. म्हणूनच रामायणाच्या कथेची ही चित्रपटीय मांडणी मी स्वीकारू शकत नाही. माझा आक्षेप कुणाच्या अभिनयावर, दिसण्यावर किंवा पडद्यावरील भव्यतेवर नाही. राम आणि रावण या व्यक्तिरेखांकडे पाहण्याची जी दृष्टी चित्रपटातून समोर आली, त्यावर आहे. मला जाणवलेला राम एखाद्या नेहमीच्या चित्रपटातील नायकासारखा होता. नायिका संकटात सापडते, तिला वाचवण्यासाठी नायक प्रतिज्ञा करतो आणि संघर्षाला निघतो, इतक्यापुरतं रामाचं व्यक्तिमत्त्व मर्यादित झाल्यासारखं वाटलं. सीतेची सुटका हा रामकथेचा महत्त्वाचा भाग आहेच. पण राम म्हणजे केवळ नायिकेला वाचवायला निघालेला नायक नाही आणि सीता म्हणजे केवळ संकटात सापडलेली नायिकाही नाही. त्यांच्या नात्याला, त्यागाला आणि जीवनप्रवासाला इतक्या साध्या चित्रपटीय चौकटीत बसवलं, तर रामायणाचा मूळ गाभाच मागे पडतो. या पद्धतीने चित्रपटांद्वारे समाजामध्ये चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम होतंय, असं माझं वैयक्तिक मत आहे.
राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. हे त्याच्या नावापुढे लावायचं केवळ विशेषण नाही. त्याच्या जीवनाकडे पाहण्याची ती मूलभूत दृष्टी आहे. विष्णूचा अवतार असूनही त्याने मानवी जीवनातील दुःख, वनवास, विरह आणि संघर्ष अनुभवले. पित्याचं वचन पाळण्यासाठी राज्य सोडलं. वैयक्तिक सुखापलीकडे कर्तव्याला स्थान दिलं. संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले, सहकारी जोडले आणि अन्यायाविरुद्ध उभा राहिला. त्याचा संयम म्हणजे दुबळेपणा नव्हता आणि त्याचा त्याग म्हणजे पराभव नव्हता. सामर्थ्य असूनही त्याचा उपयोग मर्यादेत आणि जबाबदारीने करणं, यात त्याचं मोठेपण आहे. रामाने केवळ सहन करायला शिकवलं नाही, आवश्यक तेव्हा प्रतिकार करायलाही शिकवलं. म्हणून माझ्यासाठी राम हा पूजेतील दैवताबरोबरच जगण्याचा आदर्श आहे. पडद्यावर त्याचं धनुष्य आणि युद्ध दाखवणं पुरेसं नाही. त्या धनुष्यामागचा विचार, त्या संघर्षामागचं कर्तव्य आणि त्याने स्वीकारलेला त्यागही प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तेच दाखवायचं राहिलं, तर रामाचं रूप दिसेल, पण राम समजणार नाही.
आपल्या श्रद्धापरंपरेत श्रीकृष्ण आणि श्रीराम हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत. त्यामुळे कृष्ण देव आणि राम केवळ माणूस, असं विभाजन मला करायचं नाही. मात्र कृष्णाच्या जीवनकथेत त्याच्या दैवी सामर्थ्याचं प्रकटीकरण, लीला आणि विश्वरूपदर्शन ठळकपणे समोर येतं. रामाच्या जीवनात मला विशेष भावतो तो मानवी परिस्थितीतून मार्ग काढण्याचा आदर्श. दैवत्व असूनही दुःखापासून मुक्त असलेलं आयुष्य त्याच्या वाट्याला आलं नाही. त्यालाही नाती जपावी लागली, कठीण निर्णय घ्यावे लागले आणि संकटांना सामोरं जावं लागलं. सामान्य माणसाला राम जवळचा वाटतो तो यामुळे. आपल्या आयुष्यात दुःख आलं म्हणजे आपला मार्ग चुकीचा आहे असं नाही. तसंच आपल्यावर अन्याय झाला म्हणून दुसऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार मिळत नाही. ही समज रामाच्या जीवनातून मिळते. रामायण मांडताना ही खोली अपेक्षित आहे. केवळ पराक्रमी नायक दाखवून मर्यादा पुरुषोत्तम उभा करता येत नाही.
याउलट चित्रपटात रावणाविषयी सहानुभूती निर्माण करण्यावर अधिक भर असल्याचं मला जाणवलं. त्याच्यावर अन्याय झाले, त्यामुळे तो पेटून उठला, त्याने देवाची प्रार्थना केली, त्याला मंत्रांचं ज्ञान होतं, अशी मांडणी समोर येते. तो राजा म्हणून पुढे येताना, आपण जसं राहू आणि जे खाऊ तसंच प्रजेलाही मिळेल, अशा आशयाची भूमिका त्याच्या तोंडी येते. या सगळ्यातून प्रेक्षकाच्या मनात रावणाच्या निवडी योग्य होत्या असा समज निर्माण होत असेल, तर त्यावर प्रश्न विचारावाच लागेल. रावण विद्वान, सामर्थ्यवान आणि शिवभक्त होता, हे सांगण्याला माझा आक्षेप नाही. पण त्या गुणांच्या आड त्याच्या चुकीच्या मार्गाचं समर्थन होऊ शकत नाही. मंत्र मुखोद्गत असणं किंवा भक्ती करणं यामुळे प्रत्येक कृती योग्य ठरत नाही. विद्वत्ता म्हणजे चारित्र्याचं प्रमाणपत्र नाही आणि स्वतःवर झालेला अन्याय म्हणजे दुसऱ्यावर अन्याय करण्याचा परवाना नाही. ‘रावण चांगलाच होता, परिस्थितीने त्याला असं बनवलं’ असा अर्थ प्रेक्षकापर्यंत पोहोचणं मला मान्य नाही. माझ्या दृष्टीने या चित्रपटाची मांडणी अशाच चुकीच्या कथनाला बळ देते. याला माझा शंभर टक्के आक्षेप आहे.
रावण म्हणजे वृत्ती, चुकीची वृत्ती. स्वतःच्या सामर्थ्याचा गर्व, दुसऱ्याच्या इच्छेला किंमत न देणं, स्त्रीला आपल्या अधिकाराची वस्तू समजणं आणि योग्य सल्ला मिळूनही अहंकाराने चुकीच्या मार्गावर ठाम राहणं, ही रावणवृत्ती आहे. ही वृत्ती समाजात नको आहे. रावणाकडे ज्ञान होतं, सत्ता होती, वैभव होतं आणि मोठं सामर्थ्यही होतं. पण एवढं सगळं असून त्याने निवडलेला मार्ग कोणता होता? सीताहरणाचं समर्थन त्याच्या विद्वत्तेने होणार नाही. प्रजेविषयी चांगलं बोलल्याने स्त्रीवर केलेला अन्याय पुसला जाणार नाही. म्हणून रावण किती शक्तिशाली होता यापेक्षा त्याने त्या शक्तीचा उपयोग कशासाठी केला, हे महत्त्वाचं आहे. शक्तिशाली असणं आणि अनुकरणीय असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. रावण शक्तिशाली होता, पण तो आपला आदर्श नाही. त्याच्या चुकीच्या वृत्तीला भव्य प्रवेश, प्रभावी संवाद आणि सहानुभूतीची पार्श्वभूमी दिली म्हणून ती स्वीकारण्याजोगी होत नाही. आपल्याला रामाचा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा आहे, रावणवृत्तीला आकर्षक रूप देऊन तिचं समर्थन करायचं नाही.
या लेखासोबतच्या चित्रातूनही मला हाच विचार मांडायचा आहे. राम मोठा, प्रकाशमान आणि स्पष्ट दिसतो. रावण लहान आणि सावलीत आहे. आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या आदर्शाच्या जागी राम आहे. त्या जागी रावणाला स्थान नाही. रामाचं मोठेपण त्याच्या रूपात किंवा विजयातच नाही, ते त्याच्या कर्तव्यात, त्यागात, संयमात आणि मर्यादेत आहे. चित्रपटनिर्मात्यांना दृष्टिकोन मांडण्याचं स्वातंत्र्य आहे पण काहीही खपवून घेतले जाणार नाही. रामायण हाताळताना दृश्यांच्या भव्यतेबरोबर विचारांची जबाबदारीही स्वीकारावी लागेल. मी पाहिलेल्या चित्रपटात रामाचा आदर्श मागे पडून रावणाला मोठं करण्याची मांडणी मला जाणवली आणि ती मी पूर्णपणे नाकारतो. अशा चित्रपटांवर सभ्य पण स्पष्ट टीका झाली पाहिजे. माझं ठाम मत आहे की रामाच्या आदर्शाला दुय्यम करून रावणाच्या चुकीच्या मार्गाचं उदात्तीकरण करणाऱ्या चित्रपटांना तिकीट काढून पाठिंबा देऊ नये. शांततापूर्ण बहिष्कार हा प्रेक्षकांचा योग्य प्रतिसाद असू शकतो. आपण कोणत्या वृत्तीला नायकत्व देतो, याचं भान ठेवायलाच हवं. माझ्यासाठी राम मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि रावण ही टाळायची वृत्ती आहे.
लेखकाविषयी · WhatsApp वरील मूळ पोस्ट
#प्रेरणा
Rama Is the Ideal, Ravana Is a Mindset to Avoid!
©️🖌️ YD
An effort to express reflections on the nation through words…
I went with my sister to watch a film based on the Ramayana. I had decided not to form an opinion before watching it, but to see it for myself and then speak. I watched the film. But I cannot accept the way Rama has been portrayed in it. That is why I cannot accept this cinematic interpretation of the Ramayana. My objection is not to anyone’s acting, appearance or the grandeur on screen. It concerns the perspective on Rama and Ravana that the film presents. The Rama I saw seemed like the hero of an ordinary film. The heroine falls into danger, the hero vows to rescue her and sets out to fight. It felt as though Rama’s personality had been confined to that much alone. Sita’s rescue is certainly an important part of Rama’s story. But Rama is not merely a hero setting out to save a heroine, nor is Sita merely a heroine in distress. If their relationship, sacrifices and journey through life are fitted into such a simple cinematic framework, the very essence of the Ramayana is left behind. In my personal opinion, films presented in this manner are spreading a misleading narrative in society.
Rama is Maryada Purushottam, the supreme exemplar of righteous conduct. This is not merely an epithet to place before his name. It is the fundamental perspective through which his life must be understood. Despite being an incarnation of Vishnu, he experienced the sorrow, exile, separation and struggle of human life. He gave up his kingdom to honour his father’s word. He placed duty above personal happiness. He worked to find a way through adversity, brought companions together and stood against injustice. His restraint was not weakness, and his sacrifice was not defeat. His greatness lies in possessing power while using it within moral bounds and with responsibility. Rama taught us not only to endure, but also to resist when necessary. That is why, for me, Rama is both a deity to worship and an ideal for living. Showing his bow and battles on screen is not enough. The thought behind that bow, the duty behind that struggle and the sacrifices he accepted must also reach the audience. If these are left out, we may see Rama’s form, but we will not understand Rama.
In our tradition of faith, both Shri Krishna and Shri Rama are incarnations of Vishnu. I therefore do not wish to draw a distinction that treats Krishna as God and Rama as merely human. Yet in Krishna’s life story, the manifestation of his divine power, his leelas and the revelation of his universal form stand out. What especially moves me in Rama’s life is the example he sets of finding a way through human circumstances. Despite his divinity, his life was not free from sorrow. He too had to preserve relationships, make difficult decisions and face adversity. This is why ordinary people feel close to Rama. The presence of suffering in our lives does not mean that our path is wrong. Nor does suffering injustice give us the right to inflict injustice on someone else. We gain this understanding from Rama’s life. This depth is what I expect in a portrayal of the Ramayana. Merely depicting a valiant hero cannot bring Maryada Purushottam to life.
By contrast, I felt that the film placed greater emphasis on creating sympathy for Ravana. It presents him as someone who suffered injustice and therefore rose in anger, who prayed to God and possessed knowledge of mantras. As he emerges as a king, he is given words to the effect that his people will have the same living conditions and food as he does. If all this leads the audience to believe that Ravana’s choices were right, that portrayal must be questioned. I have no objection to acknowledging that Ravana was learned, powerful and a devotee of Shiva. But those qualities cannot be used to justify his wrongful path. Knowing mantras by heart or practising devotion does not make every action right. Learning is not a certificate of character, and injustice suffered by oneself is not a licence to inflict injustice on others. I cannot accept a message that leaves the audience thinking, “Ravana was good all along, and circumstances made him this way.” In my view, the film’s presentation strengthens precisely this misleading narrative. I object to it completely.
Ravana represents a mindset, a wrongful mindset. Pride in one’s own power, disregard for another person’s wishes, treating a woman as something one has a right to possess, and arrogantly persisting on the wrong path despite sound advice: this is the Ravana mindset. We do not want this mindset in society. Ravana had knowledge, authority, wealth and immense power. But with all of that, which path did he choose? His learning cannot justify Sita’s abduction. Speaking well of his subjects cannot erase the injustice he inflicted on a woman. What matters, therefore, is not how powerful Ravana was, but what he used that power for. Being powerful and being worthy of emulation are two different things. Ravana was powerful, but he is not our ideal. Giving his wrongful mindset a grand entrance, forceful dialogue and a sympathetic backstory does not make it acceptable. We must carry Rama’s ideal to the next generation, not give the Ravana mindset an attractive form and justify it.
The image accompanying this article conveys the same thought. Rama appears large, radiant and clear. Ravana is small and in shadow. Rama occupies the place of the ideal that guides our lives. Ravana has no place there. Rama’s greatness lies not only in his appearance or victory, but in his duty, sacrifice, restraint and moral discipline. Filmmakers have the freedom to present a perspective, but that does not mean audiences must accept anything. In portraying the Ramayana, they must accept responsibility for their ideas alongside the grandeur of their visuals. In the film I watched, I felt that Rama’s ideal was pushed into the background while Ravana was elevated, and I reject that portrayal completely. Such films should face criticism that is civil but clear. I firmly believe that we should not support films by buying tickets when they relegate Rama’s ideal to second place and glorify Ravana’s wrongful path. A peaceful boycott can be an appropriate response from viewers. We must remain conscious of the mindset to which we give heroic status. For me, Rama is Maryada Purushottam, and Ravana represents a mindset we must avoid.
About the author · Original WhatsApp post
#Prerna
राम आदर्श हैं, रावण वह वृत्ति है जिससे बचना चाहिए!
©️🖌️ YD
शब्दों के माध्यम से राष्ट्रचिंतन प्रस्तुत करने का एक प्रयास…
बहन के साथ रामायण पर आधारित एक फिल्म देखने गया। मैंने तय किया था कि फिल्म देखे बिना राय नहीं दूँगा, पहले स्वयं देखूँगा और फिर अपनी बात रखूँगा। फिल्म देखी। लेकिन उसमें राम को जिस तरह दिखाया गया है, वह मुझे स्वीकार्य नहीं है। इसीलिए रामायण की कथा की यह फिल्मी प्रस्तुति मैं स्वीकार नहीं कर सकता। मेरी आपत्ति किसी के अभिनय, रूप या पर्दे की भव्यता पर नहीं है। मेरी आपत्ति राम और रावण के चरित्रों को देखने की उस दृष्टि पर है, जो फिल्म में सामने आई। मुझे उसमें राम किसी सामान्य फिल्म के नायक जैसे लगे। नायिका संकट में पड़ती है, उसे बचाने के लिए नायक प्रतिज्ञा करता है और संघर्ष के लिए निकल पड़ता है। ऐसा लगा कि राम का व्यक्तित्व बस इतने तक सीमित कर दिया गया है। सीता की मुक्ति रामकथा का महत्त्वपूर्ण भाग अवश्य है। लेकिन राम केवल नायिका को बचाने निकला नायक नहीं हैं और सीता भी केवल संकट में फँसी नायिका नहीं हैं। उनके संबंध, त्याग और जीवनयात्रा को इतने सरल फिल्मी ढाँचे में बाँध दिया जाए, तो रामायण का मूल मर्म ही पीछे छूट जाता है। मेरा व्यक्तिगत मत है कि इस प्रकार फिल्मों के माध्यम से समाज में गलत नैरेटिव फैलाने का काम हो रहा है।
राम मर्यादा पुरुषोत्तम हैं। यह उनके नाम के आगे लगाने वाला केवल विशेषण नहीं है। यह उनके जीवन को देखने की मूलभूत दृष्टि है। विष्णु के अवतार होते हुए भी उन्होंने मानव जीवन के दुःख, वनवास, विरह और संघर्ष अनुभव किए। पिता का वचन निभाने के लिए राज्य छोड़ दिया। व्यक्तिगत सुख से ऊपर कर्तव्य को स्थान दिया। संकट से निकलने के लिए प्रयास किए, सहयोगियों को जोड़ा और अन्याय के विरुद्ध खड़े हुए। उनका संयम दुर्बलता नहीं था और उनका त्याग पराजय नहीं था। सामर्थ्य होते हुए भी उसका उपयोग मर्यादा और जिम्मेदारी के साथ करना, इसी में उनका बड़प्पन है। राम ने केवल सहना नहीं सिखाया, आवश्यकता पड़ने पर प्रतिकार करना भी सिखाया। इसलिए मेरे लिए राम पूजा के देवता होने के साथ ही जीवन का आदर्श भी हैं। पर्दे पर उनका धनुष और युद्ध दिखाना पर्याप्त नहीं है। उस धनुष के पीछे का विचार, उस संघर्ष के पीछे का कर्तव्य और उनके स्वीकार किए हुए त्याग भी दर्शकों तक पहुँचने चाहिए। यदि यही दिखाना रह जाए, तो राम का रूप दिखाई देगा, लेकिन राम समझ में नहीं आएँगे।
हमारी श्रद्धा-परंपरा में श्रीकृष्ण और श्रीराम दोनों विष्णु के अवतार हैं। इसलिए मैं ऐसा विभाजन नहीं करना चाहता कि कृष्ण भगवान हैं और राम केवल मनुष्य। लेकिन कृष्ण की जीवनकथा में उनकी दैवी शक्ति का प्राकट्य, लीलाएँ और विश्वरूपदर्शन विशेष रूप से सामने आते हैं। राम के जीवन में मुझे विशेष रूप से प्रभावित करता है मानवीय परिस्थितियों के बीच मार्ग निकालने का उनका आदर्श। देवत्व होते हुए भी उन्हें दुःख से मुक्त जीवन नहीं मिला। उन्हें भी संबंध निभाने पड़े, कठिन निर्णय लेने पड़े और संकटों का सामना करना पड़ा। इसी कारण सामान्य मनुष्य को राम अपने निकट लगते हैं। हमारे जीवन में दुःख आने का अर्थ यह नहीं कि हमारा मार्ग गलत है। इसी तरह हमारे साथ अन्याय हुआ है, इसलिए हमें किसी दूसरे पर अन्याय करने का अधिकार नहीं मिल जाता। यह समझ राम के जीवन से मिलती है। रामायण प्रस्तुत करते समय इस गहराई की अपेक्षा है। केवल पराक्रमी नायक दिखाकर मर्यादा पुरुषोत्तम को सामने नहीं लाया जा सकता।
इसके विपरीत मुझे लगा कि फिल्म में रावण के प्रति सहानुभूति पैदा करने पर अधिक जोर दिया गया है। उसके साथ अन्याय हुए, इसलिए वह आक्रोशित हुआ, उसने भगवान की प्रार्थना की, उसे मंत्रों का ज्ञान था, ऐसी प्रस्तुति सामने आती है। राजा के रूप में उभरते समय उसके मुख से इस आशय की बात कही जाती है कि हम जिस तरह रहेंगे और जो खाएँगे, वही प्रजा को भी मिलेगा। यदि इन सब बातों से दर्शकों के मन में यह धारणा बनती है कि रावण के निर्णय सही थे, तो उस पर प्रश्न उठाना आवश्यक है। रावण विद्वान, शक्तिशाली और शिवभक्त था, यह कहने पर मुझे आपत्ति नहीं है। लेकिन उन गुणों की आड़ में उसके गलत मार्ग का समर्थन नहीं किया जा सकता। मंत्र कंठस्थ होना या भक्ति करना हर कार्य को सही नहीं बना देता। विद्वत्ता चरित्र का प्रमाणपत्र नहीं है और स्वयं पर हुआ अन्याय किसी दूसरे पर अन्याय करने का लाइसेंस नहीं है। दर्शक तक यह अर्थ पहुँचे कि ‘रावण अच्छा ही था, परिस्थितियों ने उसे ऐसा बना दिया’, यह मुझे स्वीकार नहीं है। मेरी दृष्टि में इस फिल्म की प्रस्तुति ऐसे ही गलत कथन को बल देती है। इस पर मुझे सौ प्रतिशत आपत्ति है।
रावण एक वृत्ति है, गलत वृत्ति। अपनी शक्ति का अहंकार, दूसरे की इच्छा को महत्त्व न देना, स्त्री को अपने अधिकार की वस्तु समझना और सही सलाह मिलने पर भी अहंकार के कारण गलत मार्ग पर डटे रहना, यही रावणवृत्ति है। समाज में यह वृत्ति नहीं चाहिए। रावण के पास ज्ञान था, सत्ता थी, वैभव था और अपार शक्ति भी थी। लेकिन इतना सब होते हुए उसने कौन-सा मार्ग चुना? उसकी विद्वत्ता सीताहरण को उचित नहीं ठहरा सकती। प्रजा के बारे में अच्छी बातें करने से स्त्री पर किया गया अन्याय मिट नहीं जाएगा। इसलिए रावण कितना शक्तिशाली था, इससे अधिक महत्त्वपूर्ण है कि उसने उस शक्ति का उपयोग किसलिए किया। शक्तिशाली होना और अनुकरणीय होना दो अलग बातें हैं। रावण शक्तिशाली था, लेकिन वह हमारा आदर्श नहीं है। उसकी गलत वृत्ति को भव्य प्रवेश, प्रभावशाली संवाद और सहानुभूति की पृष्ठभूमि दे देने से वह स्वीकार करने योग्य नहीं हो जाती। हमें राम का आदर्श अगली पीढ़ी तक पहुँचाना है, रावणवृत्ति को आकर्षक रूप देकर उसका समर्थन नहीं करना है।
इस लेख के साथ दिए गए चित्र से भी मैं यही विचार प्रस्तुत करना चाहता हूँ। राम बड़े, प्रकाशमान और स्पष्ट दिखाई देते हैं। रावण छोटा और छाया में है। हमारे जीवन को दिशा देने वाले आदर्श के स्थान पर राम हैं। उस स्थान पर रावण के लिए जगह नहीं है। राम का बड़प्पन केवल उनके रूप या विजय में नहीं, उनके कर्तव्य, त्याग, संयम और मर्यादा में है। फिल्मकारों को अपना दृष्टिकोण प्रस्तुत करने की स्वतंत्रता है, लेकिन कुछ भी स्वीकार नहीं किया जाएगा। रामायण प्रस्तुत करते समय दृश्यों की भव्यता के साथ विचारों की जिम्मेदारी भी स्वीकार करनी होगी। मैंने जो फिल्म देखी, उसमें मुझे राम के आदर्श को पीछे रखकर रावण को बड़ा दिखाने की प्रस्तुति महसूस हुई और मैं उसे पूरी तरह नकारता हूँ। ऐसी फिल्मों की सभ्य लेकिन स्पष्ट आलोचना होनी चाहिए। मेरा दृढ़ मत है कि राम के आदर्श को गौण बनाकर रावण के गलत मार्ग का महिमामंडन करने वाली फिल्मों को टिकट खरीदकर समर्थन नहीं देना चाहिए। शांतिपूर्ण बहिष्कार दर्शकों का उचित उत्तर हो सकता है। हम किस वृत्ति को नायकत्व देते हैं, इसका ध्यान रखना ही होगा। मेरे लिए राम मर्यादा पुरुषोत्तम हैं और रावण वह वृत्ति है जिससे बचना चाहिए।
लेखक के बारे में · WhatsApp पर मूल पोस्ट
#प्रेरणा
Comments
Post a Comment