जबाबदारी असो वा नसो, संघकार्य सुरूच राहावे!

जबाबदारी असो वा नसो, संघकार्य सुरूच राहावे!

जबाबदारी असो वा नसो, संघकार्य सुरूच राहावे!

©️🖌️ YD
शब्दातून राष्ट्रचिंतन मांडण्याचा प्रयत्न….

चार वर्षांपूर्वी मोतीबागेत ज्येष्ठ प्रचारक पंत फडके यांना भेटायला गेलो होतो. माझ्याकडे असलेल्या संघाच्या जबाबदारीविषयी आणि त्यानिमित्त करत असलेल्या संघकामाच्या प्रयत्नांविषयी त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला. जबाबदारी आहे म्हणून संघकार्य करतो, हे स्वाभाविक आहे. पण जबाबदारी असो किंवा नसो, संघकार्य तितक्याच उत्तमपणे करणारे कार्यकर्ते घडले पाहिजेत. पुढे ते असेही म्हणाले की, ज्या स्वयंसेवकाकडे जबाबदारी नाही, त्याने तर दुप्पट उत्साहाने संघकार्य केले पाहिजे.

नुकतेच पुन्हा पंतांना भेटायला गेलो. सध्या त्यांचा मुक्काम कौशिक आश्रमात असतो. वयोमानानुसार काही व्याधी आहेत आणि पूर्वीसारखे ते फार बोलतही नाहीत. मात्र त्यांना भेटून खूप छान वाटले. जुन्या भेटींची, संवादांची आणि त्यांनी सहजपणे दिलेल्या शिकवणीची पुन्हा उजळणी झाली. काही माणसांचा सहवासच आपल्याला विचार करायला लावतो. पंतांची ही भेट तशीच होती.

यंदाच्या विजयादशमी उत्सवात आपल्या संभाजीनगराचे सहकार्यवाह राहिलेले ज्येष्ठ कार्यकर्ते अविनाश जोशी यांची भेट झाली. त्यांनी सहज विचारले, “पंतांचे म्हणणे तुला लक्षात आहे ना?” आणि तो विचार पुन्हा मनात आला. हा विचार प्रत्येक स्वयंसेवकासाठी आहे. आपल्याकडे दिलेले काम आपण करतोच. पण औपचारिक जबाबदारी नसतानाही स्वतःहून संपर्क ठेवणे, शाखेत जाणे, नवीन स्वयंसेवकांना जोडणे आणि आवश्यक तिथे मदतीला उभे राहणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

जबाबदारी बदलू शकते, पण स्वयंसेवकत्व कायम राहते. कुणीतरी काम सांगेल किंवा आपल्याकडे एखादी जबाबदारी येईल, याची वाट न पाहता आपल्याला जमेल ते योगदान देत राहायला हवे. पंतांचा सहवास आणि अविनाशजींनी करून दिलेली आठवण यातून हाच विचार पुन्हा दृढ झाला. तो स्वतःच्या आचरणात आणावा आणि आपल्या सर्वांसमोरही मांडावा, असे वाटले.

#प्रेरणा

Comments

Popular posts from this blog

विचारविश्वात आपले स्वागत!

राम आदर्श आहे, रावण ही टाळायची वृत्ती आहे!

दिवाळी मध्ये तीन नव्या कुटुंबांशी जोडूया आपुलकीचं नातं!