दुष्काळाच्या सावटातली दिवाळी-संवेदनशीलतेचा प्रकाश जपूया!

दुष्काळाच्या सावटातली दिवाळी-संवेदनशीलतेचा प्रकाश जपूया!
©️🖌️ YD
शब्दातून चिंतन मांडण्याचा प्रयत्न….
सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ही दिवाळी आनंद, आरोग्य आणि समाधान घेऊन येवो.
पण यंदाची दिवाळी जरा वेगळी आहे. शहरात आपल्याला पाण्याची टंचाई तीव्रपणे जाणवत नसली, तरी महाराष्ट्रातील अनेक भाग दुष्काळाच्या संकटाशी झुंजत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर, खेड, भोर आणि वेल्हे या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागांच्या यादीत समावेश झाला आहे. ऑक्टोबरमधील एका अहवालानुसार ग्रामीण पुण्यातील काही गावं आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. दुष्काळळाच्या परिस्थितीविषयी अलीकडे मुंबईतील एका बैठकीत माहिती मिळाली, तेव्हा मन अस्वस्थ झालं. नोव्हेंबर सुरू आहे आणि पुढील पावसाळ्यापर्यंत अजून अनेक महिने बाकी आहेत. आज पाणी सहज उपलब्ध आहे म्हणून त्याची किंमत विसरून चालणार नाही.
हे लक्षात ठेवावे लागेल दुष्काळाच्या सावटात दिवाळी, शहरात पाणी जपण्याची वेळ आहे.
हा विषय कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, वस्ती किंवा सोसायटीला उद्देशून नाही. मात्र वस्तीभागात पाणी भरताना नळ सुरू राहून पाणी वाहताना दिसतं. सोसायट्यांमध्ये झाडं आणि गाड्या धुण्यासाठी नळी वापरली जाते. या रोजच्या सवयींमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जातं. “आम्ही महापालिकेचा कर भरतो,” म्हणून पाणी कितीही वापरण्याची मोकळीक मिळत नाही. कर भरल्याने पाणी अमर्याद होत नाही; ते जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. दुष्काळग्रस्त भागातील माणसांना पाण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि शहरात सहज होणारी पाण्याची उधळपट्टी यांतील अंतर आपण समजून घ्यायला हवं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचपरिवर्तनातील पर्यावरण संरक्षणाचा विचार आपल्या रोजच्या वागण्यात उतरवण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी मोठं काही करण्याची गरज नाही. नळ उघडा ठेवू नये, गाडी बादलीने धुवावी, झाडांना गरजेपुरतंच पाणी द्यावं आणि घरातही पाण्याचा जपून वापर करावा. बदलाची सुरुवात सरकारकडून, महापालिकेकडून किंवा दुसऱ्या कुणाकडून होण्याची वाट न पाहता स्वतःपासून करूया. दुष्काळग्रस्त भागांना प्रत्यक्ष मदत कशी आणि कुठे करता येईल, याचं नियोजन करूयात, पण तोपर्यंत पाणी वाचवणं आपल्या हातात आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब जीवन देतो. त्याचं महत्त्व ओळखून त्याचं जतन करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पाण्याकडून जीवनदायीपणाची प्रेरणा घेऊया आणि पाणी जपण्याचं भान सर्वांच्या मनात रुजवूया. दुष्काळग्रस्त बांधवांची जाणीव ठेवून, संवेदनशीलतेचा प्रकाश आपल्या वागण्यातही आणणारी ही दिवाळी साजरी करूया.
#प्रेरणा
सूखे की छाया में दिवाली, संवेदनशीलता का प्रकाश बनाए रखें!
©️🖌️ योगेश देशपांडे – YD
शब्दों के माध्यम से चिंतन व्यक्त करने का प्रयास…
सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ! यह दिवाली आनंद, स्वास्थ्य और संतोष लेकर आए।
लेकिन इस बार की दिवाली कुछ अलग है। शहर में हमें पानी की कमी तीव्रता से महसूस न होती हो, फिर भी महाराष्ट्र के अनेक क्षेत्र सूखे के संकट से जूझ रहे हैं। पुणे जिले के शिरूर, बारामती, पुरंदर, दौंड, इंदापुर, खेड, भोर और वेल्हे तालुके सूखाग्रस्त क्षेत्रों की सूची में शामिल किए गए हैं। अक्टूबर की एक रिपोर्ट के अनुसार ग्रामीण पुणे के कुछ गाँवों और बस्तियों में टैंकरों से पानी पहुँचाया जा रहा था। हाल ही में मुंबई की एक बैठक में सूखे की स्थिति के बारे में जानकारी मिली तो मन व्यथित हो गया। नवंबर चल रहा है और अगले मानसून तक अभी कई महीने बाकी हैं। आज पानी आसानी से उपलब्ध है, इसलिए उसका मूल्य नहीं भूल सकते।
याद रखना होगा कि सूखे की छाया में मनाई जा रही इस दिवाली पर शहरों में पानी बचाने का समय है।
यह बात किसी विशेष व्यक्ति, बस्ती या सोसायटी को लक्ष्य करके नहीं कही जा रही। लेकिन बस्तियों में पानी भरते समय नल खुला रहने से पानी बहता दिखाई देता है। सोसायटियों में पौधों को पानी देने और गाड़ियाँ धोने के लिए नली का उपयोग होता है। इन रोजमर्रा की आदतों से बड़ी मात्रा में पानी बर्बाद होता है। “हम नगर निगम का कर भरते हैं,” इसका अर्थ यह नहीं कि कितना भी पानी इस्तेमाल करने की छूट मिल गई। कर भरने से पानी असीमित नहीं हो जाता। उसे बचाना हर व्यक्ति की जिम्मेदारी है। सूखाग्रस्त क्षेत्रों में पानी के लिए लोगों का संघर्ष और शहरों में सहज होने वाली पानी की बर्बादी के बीच का अंतर हमें समझना चाहिए।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पंचपरिवर्तन में पर्यावरण संरक्षण के विचार को अपने रोजमर्रा के व्यवहार में उतारने का यही समय है। इसके लिए बहुत बड़ा काम करने की आवश्यकता नहीं। नल खुला न छोड़ें, गाड़ी बाल्टी के पानी से धोएँ, पौधों को जरूरत भर पानी दें और घर में भी पानी का संयमित उपयोग करें। सरकार, नगर निगम या किसी और की पहल की प्रतीक्षा करने के बजाय शुरुआत स्वयं से करें। सूखाग्रस्त क्षेत्रों को कहाँ और कैसे प्रत्यक्ष सहायता दी जा सकती है, इसकी योजना बनाएँ। तब तक पानी बचाना हमारे हाथ में है।
पानी की हर बूँद जीवन देती है। उसका महत्व पहचानकर उसे सँजोना हम सबकी जिम्मेदारी है। पानी की जीवनदायिनी शक्ति से प्रेरणा लें और सबके मन में जलसंरक्षण का भाव जगाएँ। सूखाग्रस्त बंधुओं की परिस्थितियों का ध्यान रखते हुए ऐसी दिवाली मनाएँ जो हमारे व्यवहार में भी संवेदनशीलता का प्रकाश लाए।
#प्रेरणा
Diwali in the Shadow of Drought: Keep the Light of Sensitivity Alive!
©️🖌️ Yogesh Deshpande – YD
An effort to express reflections through words…
Heartfelt Diwali wishes to everyone! May this Diwali bring joy, health and contentment.
Yet this year’s Diwali feels somewhat different. Although we may not feel an acute shortage of water in the city, many parts of Maharashtra are struggling with drought. Shirur, Baramati, Purandar, Daund, Indapur, Khed, Bhor and Velhe talukas in Pune district have been included in the list of drought-affected areas. According to a report from October, tankers were supplying water to some villages and hamlets in rural Pune. Learning about the drought situation at a recent meeting in Mumbai left me troubled. It is November, and many months remain until the next monsoon. We must not forget the value of water simply because it is easily available to us today.
We must remember that, as Diwali is celebrated under the shadow of drought, it is time for cities to conserve water.
This observation is not directed at any particular person, neighbourhood or housing society. Yet in residential areas we see taps left running while water is being collected. In housing societies, hoses are used to water plants and wash vehicles. Such everyday habits waste large quantities of water. Saying “We pay municipal taxes” does not give us the freedom to use unlimited water. Paying taxes does not make water limitless. Everyone has a responsibility to conserve it. We must understand the gap between the struggle for water in drought-affected areas and the casual waste of it in cities.
This is the time to put environmental protection, one of the Rashtriya Swayamsevak Sangh’s five areas of social transformation, into everyday practice. We need not begin with anything grand. Do not leave taps running, use a bucket to wash the car, give plants only as much water as they need, and use water carefully at home. Let us start with ourselves instead of waiting for the government, the municipality or someone else to act. Let us plan where and how we can directly help drought-affected areas. Meanwhile, saving water is already in our hands.
Every drop of water sustains life. Recognising its value and conserving it is our shared responsibility. Let us draw inspiration from water’s life-giving nature and nurture awareness of water conservation in everyone. Keeping our drought-affected fellow citizens in mind, let us celebrate a Diwali that brings the light of sensitivity into our conduct too.
#Prerna
Comments
Post a Comment