शिष्यवृत्तीचा हात, स्वावलंबी उद्याची वाट!

शिष्यवृत्तीचा हात, स्वावलंबी उद्याची वाट!

शिष्यवृत्तीचा हात, स्वावलंबी उद्याची वाट!

ज्या मॉडर्न शाळेमध्ये (जंगली महाराज रस्ता )मी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले, त्याच त्याच शाळेत आयोजित शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात सुदर्शन भारत सेवा फाउंडेशन तर्फे संचालक म्हणून मला प्रमुख पाहुणे, या साठी आमंत्रित केले होते. माझ्यासाठी हा सन्मानाचा आणि विशेष आनंदाचा क्षण होता.
तसेच कार्यक्रमात मा. श्री. सुभाष कदम, विद्यापीठ भाग संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे, प्रमुख वक्ते म्हणून होते. प्रा. डॉ. निवेदिता गजानन एकबोटे, नगरसेविका व प्राचार्या, मॉडर्न महाविद्यालय, पुणे उपस्थित होत्या. संस्थापक अध्यक्ष मिलिंदजी एकबोटे यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

श्री. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने सुरू झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे यांचा हा सातवा शिष्यवृत्ती वितरण सोहळा होता. गेली सलग सात वर्षे पतसंस्था आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना बाळासाहेब देवरस शिष्यवृत्ती देत आहे. या शिष्यवृत्तीचा अर्थ केवळ आर्थिक मदत देणे नाही, तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या या वर्षाच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलणे हा आहे. २५ कोटी रुपयांचे भागभांडवल असलेली ही पतसंस्था गरीब, पीडित आणि गरजू समाजघटकांनाही आर्थिक आधार देण्याचे काम करते.

माननीय भाग संघचालकांनी सर्वांना मार्गदर्शन करताना, शिक्षण हे विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता वाढवण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे, हा विचार मांडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे सेवा, विचार आणि संघटन यांवर आधारलेले आहे, असे सांगताना त्यांनी सामाजिक एकता, अनुशासन आणि सेवाभावाचे महत्त्वही अधोरेखित केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांशी बोलताना मी म्हटले, “मी तुम्हाला मार्गदर्शन करायला आलो नाही, फक्त तुमच्याशी बोलायला आलो आहे.” आज आपण मदत घेणारे आहोत, उद्या मदत देणारे व्हायला हवे, हा विचार मी त्यांच्यासमोर मांडला. मिळालेल्या संधीचा उपयोग करून शिक्षणात पुढे जायचे आणि भविष्यात इतरांच्या प्रगतीसाठी हातभार लावायचा, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, असे मला वाटते.

प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी आपल्या भाषणात सांगताना, त्यांच्या बालपणाची आठवण सांगितली की, त्या लहान असताना संस्थेला सुरवात झाली आणि त्याचा मोठा वृक्ष होऊन सर्वांना आज या पतसंस्थेचा खूप मोठा फायदा होत आहे.

मिलिंद भाऊ एकबोटे यांनी आपल्या भाषणात हिंदू समाजात गरिब कोणी राहता कामा नये अशीच इच्छा व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची सुध्दा धारणा अशीच असते असे नमूद केले.

एकूण २२ विद्यार्थांना या वेळी शिष्यवृत्ती देण्यात आली. श्री. सुभाष कदम यांनी दोन दोन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली.
त्यांच्या आदर्श घेऊन याच भावनेतून सुदर्शन कडून या वर्षासाठी दोन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा हातभार लावता आला, याचे मनापासून समाधान आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या शिक्षणाला आधार देणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्थेचे आणि कार्यक्रमातील सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आणि उज्ज्वल वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!

योगेश देशपांडे - YD

#समरसता
#सेवा

#प्रेरणा

Comments

Popular posts from this blog

विचारविश्वात आपले स्वागत!

राम आदर्श आहे, रावण ही टाळायची वृत्ती आहे!

दिवाळी मध्ये तीन नव्या कुटुंबांशी जोडूया आपुलकीचं नातं!